कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम नाकारून चालणार नाही. मात्र, समाजकारण आणि राजकारणाला योग्य दिशा मिळाली नाही. समाज आणि राजकारणाची दिशा सुधारण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत नसल्यामुळेच सगळे पक्ष त्यांच्या विरोधात आले आहेत, अशी टीका शाहू महाराज छत्रपती यांनी शुक्रवारी येथे केली.

महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभासाठी शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. यानंतर कोल्हापूरमध्ये साखर पेढे वाटून व फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराज यांनी पत्रकार परिषदेत घेऊन भूमिका स्पष्ट केली, त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

हेही वाचा – लिंगायत मतपेढीचे गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

शाहू महाराज म्हणाले, जनतेच्या प्रचंड आग्रहामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. कोल्हापूरच्या विकासाला नवीन चेहरा आणि गती देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. विकास सगळेच करीत असले तरी त्याला योग्य दिशा देण्याचे काम माझे असेल.