कोल्हापूर: विख्यात चित्रपट कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कोल्हापूरच्या चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्रासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नवउर्जा महोत्सव, कला महोत्सव येथे उपस्थिती लावून त्यांनी आपल्या कलेचे दर्शन घडवतानाच आपल्या ज्ञानाचाही लाभ नव्या पिढीला व्हावा यासाठी प्रयत्न केले होते.

करोना संसर्ग सुरू होण्यापूर्वी तीन वर्षे त्यांनी सतत कोल्हापुरात येऊन कलाक्षेत्राशी संवाद ठेवला होता. सन २०१७ मध्ये कोल्हापूर चंद्रकांत जोशी यांनी आयोजित ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला’ देसाई यांनी उपस्थिती लावली होती. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कला विश्व उलगडून दाखवले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट बनवण्याची संकल्पना बोलून दाखवली होती. प्रेक्षकाला चित्रपटातून लार्जर दॅन लाईफ अनुभूती हवी असते. कथानकानुरूप बनवलेले नेपथ् रसिकांना भावते. त्यातून चित्रपटाची सौंदर्य अनुभूती मिळते. ही भव्यदिव्यता बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटातून चालत आली आहे. डिजिटलचे युग असले तरी मानवी भावनांचा आविष्कार, कलेचे संचित सोबत ठेवून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली होती. इतिहासाचे विकृतीकरण ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असल्याचा उल्लेख त्यांनी पद्मावती चित्रपटाच्या वादावरून केला होता.

हेही वाचा – कोल्हापूर : दूधगंगा नदीतील सुळकुड पाणी योजनेबाबत इचलकरंजीकर आक्रमक; शासन निर्णयानुसार कृती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

हेही वाचा – इचलकरंजी अन् कागलच्या नेत्यांमध्ये संघर्ष, पाणी योजनेवरून वाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Nitin Desai contribution to Kolhapur
सतीश पाटील यांनी आयोजित केलेल्या कला महोत्सवाचे उद्घाटन नितीन देसाई यांनी केले

तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने कोल्हापुरात सण २०१७ व २०१८ मध्ये ‘नव ऊर्जा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी निर्माण चौकामध्ये भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा अनुभव ‘लोकसत्ता’ला सांगताना चिकोडे म्हणाले, कोल्हापुरात नवरात्रीमध्ये काही भव्य कलाकृती साकारली जावी यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी नितीन देसाई यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या नगरीत देवीदेवता संकल्पनेवर आधारित महोत्सव करण्यासाठी यायला निश्चित आनंद वाटेल असे सांगून त्यांनी सलग दोन वर्षे या महोत्सवासाठी काम केले. दोन ते तीन आठवडे त्याची उभारणी होत असे. अतिशय तन्मयतेने नितीन देसाई याची उभारणी करत असत. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन रोजच्या कामकाजाला ते सुरुवात करत. त्यांची कल्पक सजावट कोल्हापूरकरांच्या कायम स्मरणात राहणारी आहे. यातून लोककला, लोकसंस्कृती, लोकदेवता यांची अतिशय वेधक मांडणी केली होती. तर माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये कला महोत्सव आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन नितीन देसाई यांनी केले होते. यावेळी त्यांनी कलाकारांशी कलाक्षेत्राविषयी संवाद साधला होता. एका हाडाच्या कलाकाराला कलेची खरी किंमत कळते, अशा भावना यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या.