आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवल्याने येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देतानाच कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात नागरिकांना साखर-पेढे वाटले. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
आसाममध्ये काँग्रेस विरोधात जनतेने कौल दिला. भाजपने आसाममध्ये जोर लावल्याने प्रथमच ‘कमळ’ उमलले आहे. आसाममध्ये भाजप आघाडी काँग्रेसला धक्का देत सत्तेवर आल्याने तसेच केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथे भाजपचा टक्का वाढल्याने कार्यकत्रे आनंदित होते. त्यांनी शिवाजी चौकात जल्लोष साजरा केला. या वेळी माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, लोकसभा निवडणुकांमधील भाजपच्या संभाव्य विजयाचा भक्कम पाया घातला गेला असल्याचे दिसून आले आहे. आज ‘काँग्रेसमुक्त भारत’ या आमच्या मोहिमेच्या दिशेने दोन पावले मार्गक्रमण केले आहे. विजय जाधव यांनी केरळसहित पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमधील पक्ष कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्न व त्यागामधूनच या राज्यांमध्ये पक्षाचा प्रभाव प्रस्थापित करण्यात यश मिळाले असल्याचे नमूद केले.
आसाम राज्यामध्ये भाजपने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या विजयाचे श्रेय शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वास असल्याचा उल्लेख त्यांनी केला.