महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था गटात कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी आवाडे यांनी जिल्ह्यात आपणांस अनुकूल वातावरण असल्याचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांना सांगितले.
विधानपरिषदेसाठी सध्या जिल्ह्यातून मोठी मोच्रेबांधणी सुरु आहे. आवाडे यांनीही उमेदवारीची मागणी केली असून गेल्या आठवडय़ात ते वस्त्रोद्योग परिषदेसाठी परदेशात असल्याने इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी चव्हाण यांची भेट घेऊन आवाडे यांनाच उमेदवारी मिळण्याबाबत मागणी केली होती. आवाडे परदेश दौऱ्यावरुन परत आल्यानंतर त्यांनी चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय स्थितीची माहिती चव्हाण यांना दिली. जिल्ह्यात पक्षाच्या पुनर्बाधणीसाठी आपल्याला उमेदवारी मिळणे का गरजेचे आहे याबाबत सविस्तर चर्चा करुन उमेदवारी मिळाल्यास पक्षाचे मतदार आपल्या पाठीशी राहतील असा विश्वासाही या वेळी दिला. चव्हाण यांनी एकूणच हालचालीबाबत आवाडे यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2015 रोजी प्रकाशित
विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी आवाडेंनी घेतली चव्हाणांची भेट
काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली

First published on: 25-11-2015 at 03:20 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates legislature ashok chavan prakash avade visit