कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उद्देशून ‘ हू इज धंगेकर ‘ असे म्हणत हिणवले होते. त्यावरून निर्माण झालेला वादावरून महा विकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूरमध्ये कोंडी केली आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर कोल्हापुरातील मध्यवर्ती ताराराणी चौकात ‘ धिस इज धंगेकर ‘ असा उल्लेख असलेले भव्य फलक शनिवारी झळकवण्यात आले आहे.

या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना चिमटा काढण्यात आला आहे. हा फलक लावल्यानंतर महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वतःला गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून घेणाऱ्याने दुसऱ्याला दुसऱ्याला तुच्छ लेखता कामा नये. याची जाणीव करून देण्यासाठीच येथे हे फलक लावले आहे. कसबा मध्ये जे घडले त्याची पुनरावृत्ती २०२४ च्या निवडणुकीत दिसेल, असे यावेळी कार्यकर्ते म्हणाले.