कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे १०० व ५० रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुद्धी मिळावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावे यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधीस्थळ कोल्हापूरपर्यंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून कैफियत पदयात्रेस सुरुवात केली.

स्वाभिमानीच्यावतीने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक प्रश्नावर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन केले होते. उसाला तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर दिलेल्या शेतकऱ्यांना १०० रुपये प्रति टन मिळावेत तसेच तीन हजारापेक्षा कमी पैसे दिलेल्याना ५० रुपये द्यावेत ही मागणी होती. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तशी हमी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. याबाबतची जबाबदारी शासनाने पार पाडली नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

हेही वाचा – राजू शेट्टी यांची वाटचाल आव्हानात्मक

हेही वाचा – शाश्वत विकास परिषदेमधून कोल्हापूरला सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून उदयास येण्यासाठी घोषणापत्राची निर्मिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी कोणतीही अपेक्षा ठेवता चळवळ करत आलो आहे. यावेळी कदाचित शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल, पण आम्ही लढत राहणार आहोत. मी हार मानणार नसल्याचे त्यांनी सांगितले. काही मंत्री शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन स्थगित केले असल्याचे सांगत आहेत. तसा कोणताही आदेश प्रशासनाकडे आलेला नाही. हा महामार्ग स्थगित नको रद्दच करावा, ही आमची भूमीका असल्याचेही शेट्टी म्हणाले. डॉ. जालिंदर पाटील यांचयासह नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.