प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळ (ता. करवीर) येथे भारत राखीव बटालियनच्या मैदानावर गोल रिंगण सोहळा आयोजित करण्यावरून ग्रामस्थ व पोलीस यांच्यात सोमवारी धक्काबुक्की झाली. ग्रामस्थांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करणे भाग पडले. पोलिसांचे सुरक्षाकडे भेदून ग्रामस्थांनी पालखी सोहळा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदवाळ येथे आषाढी एकादशीला भव्य स्वरूपात सोहळा पार पडतो. कोल्हापुरातून दिंडी नंदवाळपर्यंत निघताना भव्य रिंगण सोहळा होतो. गावात गेला आठवडाभर हरिनाम सप्ताह सुरू आहे. या अंतर्गत गावातील भारत राखीव बटालियनच्या आरक्षित मैदानावर रिंगण सोहळा दिंडीचे आयोजन केले होते. त्यासाठी गेले काही दिवस जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन बटालियन अधिकारी यांच्याशी ग्रामस्थ चर्चा करत होते. या जागेवर सोहळा करण्यावर ग्रामस्थांचे एकमत होते. तर कायदा-सुव्यवस्था त्याला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी आज आरक्षित मैदानावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict between police and people in nandwal kolhapur ringan sohla hrc
First published on: 28-03-2022 at 18:40 IST