कोल्हापूर : नवरात्रीचा सण तोंडावर आला असताना कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल स्टँड काढण्याचा विषय विषयावरून आज वाद रंगला. चप्पल स्टँड हटवण्यास चालकांकडून विरोध झाला. तर कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे स्टॅन्ड बाजूला केले. अतिक्रमण विभाग, पोलीस यांनी विक्रेत्यांना दूर सारण्यावरून शाब्दिक चकमक झडली.

नवरात्रीच्या सुरुवातीला महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. यावर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शेजारच्या शेतकरी संघाच्या इमारतीमध्येही दर्शन सोय केली आहे. मंदिरा लगत असलेल्या चप्पल स्टँडचा अडथळा होतो असे निदर्शनास आले होते. त्यामुळे ते दूर करावी अशी मागणी केली होती.

आणखी वाचा-‘चिठ्ठी आई है’ .. पण पोस्टमन कडून नव्हे तर खासदारपुत्राकरवी; कृष्णराज महाडिकने केला पत्राचा बटवडा

त्यानुसार कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने चप्पल स्टँड चालकांना ते काढण्याबाबत कळवले होते. त्यास नकार मिळाला होता. त्यावर आज अतिक्रमण विभागाच्या पथकाने चप्पल हटवण्यास सुरुवात केली. त्यास चप्पल स्टँड चालकांकडून जोरदार विरोध झाला. विशेषता महिलांनी पथकाच्या अंगावर धावून जाण्यास सुरुवात केली. त्यातून शाब्दिक चकमक वाढत गेली. महिला आक्रोश करीत होत्या. पोलिसांच्या सहकाऱ्यांने त्यांना बाजूला काढून पथकाने येथील परिसरातील सर्व चप्पल स्टँड हटवले. यामुळे हा परिसर रिकामा दिसू लागला आहे. मात्र या प्रकारावरून नवरात्रीच्या सुरुवातीलाच महालक्ष्मी मंदिर परिसरात तणाव दिसू लागला आहे.

आणखी वाचा-नागपुरात मनसेचे टोलविरोधातील आंदोलन ऐनवेळी रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चप्पल स्टँड वादग्रस्त अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल स्टँड चालकांच्या वागण्यावरून भाविकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. डिसेंबर महिन्यात एका भाविकांनी ज्यादा पैसे दिले होते. ते परत मागण्या वरून वाद झाला होता. चप्पल स्टँड चालकाने विषय इतका वाढवला की संबंधित भाविक आणि एका पोलिसाला कपडे काढण्यास भाग पाडले होते. यावरून चप्पल स्टँड चालकांचा वाद पोलिसात पोहोचला होता. त्यांच्या वर्तुणूक विषयी जोरदार टीका झाली होती.