देशातील ७९२ खासदारांपकी टॉप थ्री खासदारांमध्ये  निवड  झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी विधायक कामावर भर देण्याचे ठरवले असून त्यांनी अ‍ॅनिमियामुक्त कोल्हापूर आणि उद्योग वाढीसाठी कोल्हापूर ब्रँडींग या दोन उपक्रमांवर भर देण्याचा संकल्प केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाडिक यांनी पत्रकार परिषदेत संकल्पाची मांडणी केली. ते म्हणाले,  जिल्’ाात काही उपक्रम राबविणे व प्रकल्प आणणे याकडे लक्ष देणार आहे. यामध्ये लोकसहभागातून अ‍ॅनिमिया मुक्त कोल्हापूरसाठी डॉक्टर्स, मेडिकल शॉप्स यांच्या सहकार्याने स्त्रियांसाठी आरोग्यशिबिर घेणार आहे.

उद्योग वाढीसाठी कोल्हापूर ब्रँडींग ही संकल्पना राबविण्यासाठी जिल्’ाात नवीन प्रकल्प व मोठी गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी , वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, बँकर्स, बिल्डर्स यांची व्यापक बठक घेऊन जिल्’ाात येणाऱ्या अडचणी दूर करुन प्रकल्प आणावे यासाठी कृतिशील कार्यक्रम करणार आहे. यातून उर्वरित तीन वर्षांत जिल्’ााचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातून राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडून गेल्यानंतर  दोन वर्षांच्या काळात संसदेत चांगले काम करण्याची व बोलण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न मांडताना त्याला पूरक अभ्यासाची जोड दिली. त्यामुळे पहिल्याच वर्षी टॉपटेन खासदारांमध्ये समावेश झाला. तर दुसऱ्या वर्षी टॉप थ्री मध्ये निवड झाली. यातून गेल्या एक वर्षांत एकूण ५३८ प्रश्न मांडले. कोल्हापूरचा खासदार म्हणून संसदेत वेगळी ओळख निर्माण केली. संसदेत मांडलेल्या प्रश्नाची केंद्र शासनाने दखल घेऊन कार्यवाहीही सुरु केली आहे.

अच्छे दिन दूरच

केंद्र सरकारबद्दल देशातील अनेक घटक नाराज आहेत.  करामुळे सराफ व्यावसायिक, नीटमुळे विद्यार्थी, दुष्काळ, ऊसदर व कर्ज यामुळे शेतकरी नाराज आहेत.  इतर व्यवसायाच्या अनेक अडचणी असल्यामुळे देशात सरकारवरील नाराज घटकांचे प्रमाण जास्त दिसते. जनतेला अजूनही अच्छे दिन दिसत नाहीत, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay mahadik doing constructive work
First published on: 24-05-2016 at 02:01 IST