कोल्हापूर : येथील डॉ. प्रकाश गुणे यांनी आज सेना दलासाठी एक कोटी रुपयांची मदत दिली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे आज त्यांनी मदतीचा धनादेश प्रदान केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापुरातील डॉक्टर गुणे हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय व्यवसायामध्ये या कुटुंबातील चार पिढ्या सेवेत आहेत. मूळचे गडहीग्लज येथील डॉक्टर अनंत पुणे यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रथम प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश पुणे यांनी कोल्हापुरात निर्मल रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा सुरू केली. ते कोल्हापुरातील पहिले मूत्र विकार तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुत्र डॉक्टर राहूल व नातू आर्यन डॉक्टर यांनी हेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.


आज डॉक्टर प्रकाश व त्यांच्या पत्नी अनुराधा गुणे यांनी राजनाथ सिंग यांच्याकडे सेनादलाच्या मदतीसाठी एक कोटीचा धनादेश प्रदान केला. यापूर्वीही डॉक्टर गुणे यांनी विविध सामाजिक कार्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. मात्र हे काम करत असताना ते प्रसिद्धीपासून दूर राहिले आहेत. राजनाथ सिंग यांनी ट्विट केल्यानंतर त्यांनी केलेली माहिती लोकांना समजली. त्यावर समाज माध्यमात त्यांच्या या कार्याचे कार्याबद्दल कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr prakash gune donates rs 1 crore to the army srk
First published on: 13-08-2021 at 21:57 IST