शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांची निवड झाली आहे. गावगाडय़ाचं वास्तव रेखाटणारा लेखक अशी ओळख असणाऱ्या गवस यांना पुन्हा या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. व्ही. जे. फुलारी (भौतिकशास्त्र), डॉ. अकल्पिता अरिवदेकर (जैवरसायनशास्त्र), तर डॉ. सुमन बुवा (प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग) यांचीही विभागप्रमुखपदी निवड झाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गवस यांची यापूर्वी सन २०१३-१४ मध्ये मराठी विभागप्रमुखपदी निवड झाली होती. गवस हे ऐंशीच्या दशकानंतरचे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक आहेत. कथा, कादंबरी, ललितगद्य, कविता आदी वाङ्मयप्रकार हाताळत त्यांनी ग्रामीण वास्तवाचं यथार्थ चित्रण केलं आहे. सध्या विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक असणाऱ्या डॉ. डी. के. गायकवाड यांची वनस्पतिशास्त्र विभागप्रमुखपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. सन २०१४ मध्ये जून ते सप्टेंबरदरम्यान त्यांनी या पदाचे कामकाज सांभाळले होते. विद्यापीठातील लीड बोटॅनिकल गार्डनच्या दुसऱ्या टप्प्यात वनस्पती वर्गीकरण केंद्र साकारण्याला प्राधान्य देणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jun 2016 रोजी प्रकाशित
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी डॉ. राजन गवस
ष्ठ साहित्यिक डॉ. गवस यांची यापूर्वी सन २०१३-१४ मध्ये मराठी विभागप्रमुखपदी निवड झाली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-06-2016 at 01:53 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr rajan gavas selected as department head of shivaji university