कोल्हापूर:  केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक बस पुरवून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने योजना आखली आहे. या योजनेमध्ये नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेचा समावेश व्हावा यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्र राज्यातील 23 शहरांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून यामध्ये इचलकरंजी शहराचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच शहरामध्ये बस सेवा सुरू करण्यासाठी परिवहन डेपो इमारत व चार्जिंग स्टेशन साठी निधी मागणीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच प्रस्ताव तयार झाल्यानंतर त्याची केंद्र शासनाकडून मंजुरी आणून इचलकरंजी शहरवासीयांसाठी प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस सुरू करणार असल्याचेही खासदार माने यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राज्यातील वस्त्रोद्योगाला आता ‘महाटफ्स’ची गती ! केंद्राच्या धर्तीवर मदतीची नवी योजना, नियोजनासाठी समितीची स्थापन

दरम्यान महावितरण कडे इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन साठी परवानगी मागितली असल्याचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले. खासदार धैर्यशील माने यांच्या या प्रयत्नामुळे लवकरच इचलकरंजी इलेक्ट्रॉनिक  बस सेवा सुरू होणार असल्यामुळे शहरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

असा असेल मार्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इचलकरंजी शहरासह शहरालगतच्या २० किमी परिसरामधील गावांमध्ये ही बस सेवा कार्यान्वित होणार आहे . शिरोली ते इचलकरंजी जयसिंगपूर ते इचलकरंजी शिरोळ ते इचलकरंजी परिसरातील गावांना या बस सेवेचा लाभ मिळणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.