कोल्हापूर : विधानभवन मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आमदार विनय कोरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी केली. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आगामी कार्ययोजनांसाठी शुभेच्छा दिल्या. जनसुराज्य पक्षाची स्थापना आमदार विनय कोरे यांनी केली आहे. त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील, खासदार धैर्यशिल माने, जनसुराज्यचे आमदार अशोक माने, आमदार विश्वजित कदम, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने उपस्थित होते.