कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याचा कायदा करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महसूल खात्याने त्वरित कायद्याचा मसुदा मंत्रिमंडळापुढे ठेवावा, या मागणीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी (जि. अहमदनगर ) येथील घरावर लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा उमेश देशमुख यांनी येथे बुधवारी केली.

अ. भा. किसान सभेच्या वतीने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थान शेतकऱ्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून  देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. उदय नारकर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किसान सभेने आयोजित केलेल्या नाशिक ते मुंबई लॉंग मार्चच्या शिष्टमंडळासोबत  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेत हे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. तसे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत करून नंतर शासनादेशही जारी केला आहे. त्यानुसार कार्यवाही करावी, यासाठी हा लॉंग मार्च २६ ते २८ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी सर्व तालुक्यांत मेळावे घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा सचिव अमोल नाईक यांनी सांगितले.