कोल्हापूर :  गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांच्या खरेदी दरात केलेली कपात मागे घ्यावी, अन्यथा जिल्हाभर दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन उभारले जाईल , असा इशारा दूध उत्पादक सभासदांनी मंगळवारी गोकुळच्या पदाधिकाऱ्यांना दिला. गोकुळने नुकतीच आणखी एकदा दूध खरेदी दरामध्ये कपात केली आहे. त्या विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे. 

हेही वाचा >>> कोल्हापूर :साखर कारखानांच्या दारात २२ दिवस आत्मक्लेश पदयात्रा; ७ नोव्हेंबरला ऊस परिषद – राजू शेट्टी

याबाबत आज बीड,म्हारूळ , बहिरेश्वर आदी परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.लंम्पि चर्मरोग प्रादुभवाने दुभती जनावरे मृत्युमुखी पावली आहेत. करोनाच्या संकटात शेतकरी अडचणीत आला आहे. अशात दूध घरात कपात केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे, या असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी गोकुळच्या दूध दर कपातीचा निषेध केला. हि कपात अन्यायकारक आहे. वार्षिक सभेपूर्वी प्रतिलिटर दोन रुपये व सभेनंतर दोन रुपये असे चार रुपये घट करून गोकुळने शेतकऱ्यांचा खिसा कापला आहे. हि दर कपात मागे घेतली नाही तर जिल्हाभर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.