गेल्या हंगामातील ऊस गाळपासाठी प्रतिटन ४०० रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला हात घातला आहे. या मागणीसाठी साखरकारखानदारांच्या दारात पायी जाऊन २२ दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन ते १७ ऑक्टोबर पासून सुरू करणार आहेत. तर यावर्षीचा ऊस परिषद जयसिंगपूर येथे ७ नोव्हेंबरला होणार आहे. हेही वाचा >>> कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर कारखान्यावर आंदोलन याबाबत सोमवारी येथे शेट्टी यांनी सांगितले की, गेल्या हंगामात साखर दरवाढ, इथेनॉल यापासून चांगले उत्पन्न मिळाले आहे. इथेनॉल निर्मितीमुळे उतारा घातल्याने एफआरपी मध्ये घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी अधिक प्रति टन ४०० रुपये द्यावेत अशी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देणारे निवेदन दिले होते. यामुळे स्वाभिमानीच्या वतीने १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखानदारांच्या दारात आंदोलन केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ४०० रुपये अधिक देऊन दर देता येणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र कोल्हापूर, सांगलीतील कारखानदारांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने हे आंदोलन केले जाणार आहे. आजपासून साखर अडवणार कर्नाटकात स्वाभिमानी व रयतु संघटना यांच्या वतीने १० ऑक्टोबर पासून हे आंदोलन केले जाणार आहे. उद्यापासून साखर कारखान्या मधून बाहेर पडणारी साखर आणि उपपदार्थ अडवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे