कोल्हापूर: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा सध्या फेरआढावा घेण्याचे काम राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समिती करीत असून राज्याच्या चित्रपट क्षेत्राला नवी ऊर्जितावस्था मिळवून देणारे धोरण बनविले जाईल असे मत सांस्कृतिक धोरण पुनर्विलेकन समितीच्या चित्रपटविषयक उपसमितीचे अध्यक्ष गजेंद्र अहिरे यांनी आज येथे व्यक्त केले. सांस्कृतिक धोरण पुनर्विलेकन समितीच्या सदस्यांची बैठक कोल्हापूर जिल्हा व जवळील चित्रपट निर्मिती व्यवसाय संबंधितांबरोबर पार पडली. यावेळी चित्रपट समितीचे अध्यक्ष गजेंद्र अहिरे, सदस्य पुरुषोत्तम लेले, मेघराज राजे भोसले, आरोह वेलणकर उपस्थित होते. तसेच सह व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते. शिवाजी शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील सभागृहात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर समिती सदस्यांनी माध्यमांची संवाद साधला.

महाराष्ट्र शासनाने सन २०१० या वर्षात सांस्कृतिक धोरण निश्चित केले आहे. कालौघात बदलणारे सांस्कृतिक बाबींचे स्वरूप आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ, सर्व सामान्य नागरिक यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचना विचारात घेऊन धोरणाचा फेर आढावा घेण्याचे काम सुरु आहे. त्या अनुषंगाने चित्रपट धोरण कसे असावे याबाबत या क्षेत्रातील मान्यवर मंडळीचे मत जाणून घेण्यासाठी धोरण समितीने बैठक आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण २०१० चा अंमलबजावणीचा फेर आढावा घेण्यासाठी समिती घटित करण्यात आली असून यामध्ये चित्रपट, नृत्य, संगीत, रंगभूमी क्षेत्राकरीता पुरेशी प्रतिनिधित्व देण्याची तसेच सदर धोरण समितीचे कामका व्यापक व परिणामकारक होण्याकरिता मूळ समितीला सहकार्य म्हणून धोरणातील सर्व क्षेत्रांमधील १० उपसमित्यांचे गठन करण्यात आले आहे. त्यापैकी ही समिती चित्रपटाशी संबंधित असल्याचे सदस्य पुरुषोत्तम लेले यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्ष गजेंद्र अहिरे यांनी राज्याच्या चित्रपट क्षेत्राला नवी ऊर्जितावस्था मिळवून देणारे धोरण बनविले जाईल असे सांगून कोल्हापूर जिल्ह्यात ६० ते ७० जणांनी उपस्थित राहून या विषयी योगदान दिल्याचे सांगितले. एकूणच चित्रपट आणि आपली संस्कृती, यातील अर्थकारण, समस्या, आव्हाने यावर बैठकीत चर्चा झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.