कोल्हापूर : इचलकरंजीत एका टाकाऊ कापडाच्या गोदामाला शनिवारी आग लागली. या ठिकाणी कोणतीही अग्निशामक यंत्रणा नसल्यामुळे आग पसरत गेली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी आग लागली होती. कलानगर परिसरात शिवसागर केसरवाणी यांचे टाकाऊ कापडाचे गोदाम आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यास आग लागली.

आजूबाजूला कापड असल्याने आग भडकत गेली. त्याची झळ आजूबाजूच्या घरांना बसली. यामध्ये त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत होते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी नेमका आकडा अधिकृतपणे समजू शकला नाही. अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांच्या साहाय्याने सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी प्रमाणात मोठी गर्दी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हलगर्जीपणा टाळावा

भर वस्तीमध्ये कापडाची गोदामे दिसून येतात. गोदामाला आग लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही साहित्य, यंत्रणा उपलब्ध नसते. त्यामुळे या प्रकारांना आवर घालण्याची मागणी होत आहे.