कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या सुपीक जमिनीत बारमाही पिके होत असताना येथे व्यापारउदीमही बहरला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जिल्ह्यात पर्यटन, सांस्कृतिक भरणपोषण, दळणवळण यामुळे येथील अर्थकारणाला बळकटी येत आहे.

साखरेच्या पट्ट्यातील कोल्हापूर जिल्हा हा उसाला राज्यात सर्वाधिक दर देणारा तद्वत कृषी, औद्याोगिकदृष्ट्या बहरलेला. कोल्हापूर शहर परिसरात फाउंड्री, इंजिनीअर उद्याोग विकसित झाला आहे. हुपरी परिसरात चांदीचा उद्याोग विस्तारला. कोल्हापूरचा गूळ देशभरातील बाजारपेठांमध्ये चांगल्या दराने विकला जातो. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजीची ख्याती आहे. देशात सर्वाधिक अत्याधुनिक शटललेस माग याच वस्त्रनगरीत आहेत. दररोज सुमारे सव्वा कोटी मीटर दर्जेदार कापडाचे उत्पादन येथे होते. यातून कोल्हापूर जिल्ह्यात उद्यामशीलता वृद्धिंगत होते आहे.

जनधन खाती १५ लाखांवर

आर्थिक सेवांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या जनधन खात्यांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात उत्तरोत्तर चढता आलेख दर्शवत आहे. गेल्या पाच वर्षांत ही संख्या जवळपास दुप्पट झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. सन २०२०-२१ मध्ये ८ लाख २४ हजार ५८२ जनधन खाती होती. तर सन २०२४-२५ या वर्षात जनधन खात्यांची संख्या १५ लाख ५९ हजार २५५ झाली आहे.

सन २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ५४ हजार रुपये इतके असून ते राज्याच्या दरडोई उत्पन्नापेक्षा (२ लाख ५२ हजार) जास्त आहे. दरडोई उत्पन्नाचा विचार करता राज्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सातवा क्रमांक लागतो.

कोल्हापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राची वाढ उत्तम प्रकारे झालेली आहे.

कर्ज वितरणामध्ये वाढ

वर्षानुवर्षे कर्ज वितरण रकमेचा आकडा वाढत चालला आहे. त्यावरून जिल्ह्याच्या अर्थक्षमतेची, इथल्या उद्याोग वाढीची प्रचीती यावी. सन २०२०-२१ या वर्षात २ लाख ३० हजार खातेदारांना ८२२५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. पुढच्याच वर्षी ही रक्कम दुपटीने वाढून १७ हजार ५६७ कोटी रुपये इतकी झाली. तर गेल्या म्हणजे २०२४-२५ या वर्षात ५ लाख २९ हजार ६५१ कर्जदारांना ३९ हजार ५१९ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.

प्रायोजक

● मुख्य प्रायोजक : सारस्वत कोऑप बँक लिमिटेड

● पॉवर्ड बाय : महानिर्मिती, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● नॉलेज पार्टनर : गोखले इन्स्टिट्यूट, पुणे