कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीला श्रीमंत शाहू महाराजांनी उभे राहू नये असे आम्हा सर्वांना वाटते,असे मत हसन मुश्रीफ मंत्री यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.याबाबत ते पुढे म्हणाले, शाहु महाराज ते आमच्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणात यावे किंवा न यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रीमंत शाहू महाराज एक आदर्श स्थान असल्यामुळे ते स्थान तसंच रहावे असे वाटते.

आपल्याकडे लोकशाही आहे.लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचे असते की कुणाला निवडून द्यायचे ते लोक ठरवतील कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून येण्यासाठी मला जीवाचे रान करावे लागेल. हाडाची कांड आणि रक्ताचे पाणी करावे लागतील.आणि दोन्ही जागा निवडून आणायला लागतील,असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>कोल्हापूर : अंबाबाई मंदिरासमोर खरमाती, मलब्याचे ढीग; भाविकांची कसरत

सुळकूड पाणी योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी उद्या सर्वच नेत्यांना बैठकीसाठी मुंबईत बोलावले आहे.त्यामध्ये सविस्तर प्रमाणे चर्चा होईल.इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी मिळावे यासाठी सरकारची आणि शासनाची इच्छा आहे,असेही त्यांनी सांगितले.कोल्हापूर शहरात शंभर कोटींच्या रस्त्याचे काम सुरू आहे. उर्वरित रस्त्यांसाठी आणखी १०० कोटींचा निधी मागितला आहे.यापूर्वी आयआरबी कडून ५० किलोमीटरचे रस्ते झालेले आहेत.बरेच रस्ते आता पूर्ण होतील. हाडाचे दवाखाने बनवायची काहीही गरज नाही.

हेही वाचा >>>“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण रस्ते अगदी गुळगुळीत करूया, असा टोला त्यांनी आंदोलक शिवसैनिकांना लगावला.  यापूर्वी कोल्हापुरी चप्पल फार मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती.त्यामध्ये बनावटगिरी सुरू झाली. त्यामुळे त्यात क्यूआर कोड करून त्यात चीप बसवण्याचे ठरले आहे. ते नवीन तंत्रज्ञान आणले आहे.त्यामुळे कोल्हापूरचे अस्सल चप्पल हे परदेशात जाईल. बनावट गिरीला आळा बसेल ,असे मुश्रीफ म्हणाले.