कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक शिवसेनेच्या अधिकृत ‘मशाल’ चिन्हावरच लढवावी लागेल, असा ठाम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे,अशी माहिती संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शनिवारी दिली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही. आघाडी अंतर्गत हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

kolhapur, shivsena, campaigning
कोल्हापुरात शिवसेनेने प्रचार थांबवला, संदेशाने खळबळ; जिल्हाप्रमुखांकडून इंकार
hatkanangale lok sabha marathi news, uddhav thackeray hatkanangale lok sabha seat marathi news
हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी इच्छूकांची ‘मातोश्री’वर धाव
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
wardha constituency, lok sabha 2024, sharad pawar, amar kale, congress, maha vikas aghadi, maharashtra politics, marathi news,
“जावई बापू प्रथम, नंतर सगेसोयरे,” शरद पवारांनी परंपरा राखली; एका दगडात दोन पक्षी…

हेही वाचा…हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी इच्छूकांची ‘मातोश्री’वर धाव

उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. उमेदवारी मिळावी यासाठी हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर , जिल्हाप्रमुख संजय चौगुले व शिवसैनिक मोठ्या संख्येने आज मातोश्रीवर गेले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी दिल्लीला गेले होते. त्यामुळे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी दूधवडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, निष्ठावान शिवसैनिकालाच प्राधान्याने उमेदवारी दिली जाईल. कार्यकर्त्यांनी प्रचाराला लागून मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवावे. मशाल चिन्हावर जो उमेदवार पक्षाकडून दिला जाईल त्यानाच निवडून आणा.

हेही वाचा…कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी

मेळाव्यात उमेदवाराची घोषणा

दरम्यान, हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण असावा याचा निर्णय लवकरच सेनाप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. याबाबत मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा लवकरच होणार आहे. त्यामध्ये उमेदवाराची घोषणा करण्यात येईल, असे सूत्राने सांगितले.हातकणंगले साठी पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. तसेच बहुमताने निवडून आणू , अशी ग्वाही माजी आमदार डॉ मिणचेकर तसेच जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.