पावसाने जिल्ह्यत पूर्वेकडील भागात उघडीप दिली असली तरी पाणलोट क्षेत्रातील जोर कायम आहे. पावसाचा वेग कायम असल्याने धरण, नदी पाणीपातळी वाढू लागली आहे. जिल्ह्य़ात गगनबावडा तालुक्यात ८१.५० मि.मी. इतका सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. गत वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी कमी आहे.
जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात पावसाची गती कायम आहे. दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८१.५० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी ३५.६३ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत एकूण ३०५८.५५ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसामुळे शेती कामांनाही वेग आला आहे. शहरासह पूर्वेकडील भागाची रिपरिप थांबली आहे. काळे ढग गर्दी करून असले तरी पावसाचा पत्ता नाही.
तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे आहे- गगनबावडा ८१,५० करवीर १७.०९, कागल २६.६०, पन्हाळा २९.५८, शाहूवाडी ५९ हातकणंगले- ३.७५, शिरोळ-३.४२, राधानगरी ४७ भुदरगड ४४.२०, गडिहग्लज २५.८५, आजरा ४८.२५ व चंदगडमध्ये ४१.६६ मि.मी., अशी एकूण ४२७.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी ७ वाजताच्या नोंदीनुसार धरणांतील पाणीसाठय़ाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणाचे नाव, आजचा पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये), पूर्णसंचय पाणीसाठा मीटरमध्ये कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे.
राधानगरी – ५४.९९ (५९०.९८), तुळशी २४.४० (६१६.९१), वारणा २४४.६९ (६२६.९०), दुधगंगा ५७.८३ (६४६), कासारी १६.२९ (६२३.००), कडवी ३३.४८ (६०१.२५), कुंभी ३१.८६ (६१२.२०), पाटगाव २४.०१ (६२६.६०), चिकोत्रा ४.२२ (६८८.००), चित्री ७.०४ (७१८.९०), जंगमहट्टी ३.६९ (७२६.२०), घटप्रभा ४३.६५ (७४२.३५), जांबरे ३.६० (७३७.००) कोदे ल. पा. ३.१८ (१२२.००) आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी १४ फूट ९ इंच, सुर्वे १६ फूट, रुई ४३ फूट ३ इंच, इचलकरंजी ४० फूट ६ इंच, तेरवाड ३८ फूट, शिरोळ २९ फूट ६ इंच, नृसिंहवाडी १९ फूट ६ इंच.