कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री शिंदे गटाचे , खासदार, आमदार आणि शेतकरी सहकारी संघाचे प्रशासकीय अध्यक्ष हे सर्वजण शिंदे गटाचे असताना संघाचे कुलूप तोडण्याचे धाडस जिल्हाधिकाऱ्यांचे झाले कसे ? ,अशी विचारणा करीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रश्न व्यवस्थित हाताळला पाहिजे म्हणून मी यात भाग घेतला नाही, असे स्पष्ट केले. शेतकरी सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव शंकरराव शिंदे तथा बाबा नेसरीकर यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रम पुण्यतिथीचा असला तरी केले काही दिवस शेतकरी संघावर जिल्हा प्रशासनाने ताबा घेण्याचे पडसाद या कार्यक्रमावर होते .अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेतकरी संघाची प्रतिमा कशी उंचावू शकते, हे बाबा नेसरीकर यांनी कर्तुत्वातून दाखवून दिली.  संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करू, पण पेट्रोल पंप प्रश्नी संजय मंडलिक यांनी लक्ष द्यावे. संघाची निवडणूक बिनविरोध करून चांगली माणसे संचालक म्हणून पाठवूया, असे आवाहन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंडलिक म्हणाले, शेतकरी संघ सहकारचे मंदिर आहे. संघाची जागा ताब्यात घेऊया. नव्या ताकदीने संघाला बळ देऊया असे सांगितले. आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, सहकाला घरघर लागली असताना उभारी देण्यासाठी बाबा नेसरीकर यांच्या सारख्या निस्विर्थी व्यक्तींची गरज आहे. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सुरेशराव देसाई यांनी केले. ते म्हणाले, संघाची निवडणूक बिनविरोध करा, संचालक म्हणून चांगल्या व्यक्तींना संधी द्यावी. निवडणूकीचा खर्च संघाला परवडणार नाही. अशासकीय प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य अजित मोहिते, जयवंत पाटील, माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते, यशोधन शिंदे उपस्थित होते.