कोल्हापूर : ट्रायडॅक्स प्रोकम्बन्स अर्थात दगडी पाला या दुर्लक्षित वनस्पतीच्या फुलांवर मकरंद खाण्यासाठी आलेल्या ४२ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद आरती पाटील या संशोधक विद्यार्थिनीने केली आहे. या सर्व नोंदी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातील असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.

त्यांचा हा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ थ्रेटण्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये काल (दि. २६) प्रकाशित झाला आहे. डॉ. सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरती पाटील यांनी दगडी पाला या प्रजातीवर मकरंद टिपण्यासाठी वर्षभरात येणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींच्या नोंदी घेतल्या. कोणत्या कालावधीत, कोणत्या वेळी या प्रजाती फुलावर येतात, त्या वेळचे हवामान, तापमान, आर्द्रता याच्याही नोंदी घेतल्या.

हेही वाचा : गुरुदक्षिणेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफ यांचे समरजित घाटगेंवर टीकास्त्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फुलपाखरांचे दर्शन

तृणकणी या भारतातल्या सर्वांत लहान फुलपाखरासह ग्रास ज्वेल, कॉमन शॉट सिल्व्हरलाइन (रूपरेखा), पिकॉक पॅन्सी (मयूर भिरभिरी), पेंटेड लेडी (ऊर्वशी), ग्रेट एग फ्लाय, (मोठा चांदवा), पायोनिअर व्हाईट (गौरांग), कॉमन गुल (कवडशा), कॉमन क्रो (हबशी), कॉमन लेपर्ड (चित्ता) आदी ४२. ‘अ स्टडी ऑन दि असोसिएशन बिटविन ट्रायडॅक्स डेझी ट्रायडॅक्स प्रोकम्बन्स एल. अँड बटरफ्लाईज ॲट शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस’ या शीर्षकाखाली हे संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.