कोल्हापूर : माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांची उणीव कधीच भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी आज गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्यासह गडहिंग्लज चंदगड, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली.

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करण्याबाबत ही भेट होती. यावेळी ते बोलत होते. येथून पुढे सर्वजण एकत्रित मिळून कायमस्वरूपी काम करूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. देशाची घटना बदलण्यासाठी भाजपाकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे. त्यामुळे त्यांचा तीन चतुर्थांश बहुमताचा अट्टाहास सुरू असल्याचा घणाघात आमदार पाटील यांनी यावेळी केला.

BJP MLA Madhuri Misal opined that since Rabindra Dhangekar is facing defeat, stunts are being played
रवींद्र धंगेकराना पराभव दिसत असल्याने स्टंटबाजी सुरू: भाजप आमदार माधुरी मिसाळ
Devendra Fadnavis
“सदाभाऊ यावेळी संधी पक्की, पण पुढच्या वेळी…”; देवेंद्र फडणवीसांचं शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान
Satej Patil, Sanjay Mandalik,
उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना जागा दाखवा; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय

हेही वाचा…शाहू महाराजांनी घेतली काडसिद्धेश्वर स्वामींची भेट; स्वामीनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा

जनता दलाचा वापरच झाला

आतापर्यंत आमचा वापर सर्वजणांनी केलाय, परंतु आमच्या पदरात काहीचं पडले नाही. मात्र आमदार सतेज पाटील यांनी आम्हाला जनता दलासह वडीलांसारखच स्वीकारून नेतृत्व स्वीकारले. याबद्दल स्वाती कोरी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.

मोर्चेबांधणी सुरू

काही दिवसापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज येथे माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी चांगल्या विचारांची लढाई लढण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना केल होते. या पार्श्वभूमीवर आज स्वाती कोरी यांच्यासह गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयात भेट घेतली.

हेही वाचा…शिंदे गटाचे खासदार माने – मंडलिक यांच्यासाठी संघर्ष कायम

यावेळी बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टी, शरद पाडळकर, विनोद मुसळे, काशिनाथ देवगोंडा, दत्ता मगदूम, ॲडव्होकेट विकास खोराटे, अकबर मुल्ला, दत्तात्रय मगदूम, बंटी कोरी, हिंदुराव नवकुडकर, अर्जुन पाटील, श्रीरंग चौगले, सचिन शिंदे, प्रणव शिंदे, प्रियंका यादव, सागर पाटील यांनी मनोगतामध्ये स्वाती कोरी यांच्यासह जनता दलाला पदरात घ्यावें, असे भावनिक आवाहन केले.

आमदार सतेज पाटील हे केवळ जिल्ह्याचे नेते नसून ते महाराष्ट्राचे नेते असल्याचे, यावेळी बोलताना गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सांगितले. आतापर्यंत आमचा वापर सर्वजणांनी केला, पण आमच्या पदरात काहीच पडलं नाही. मात्र आमदार सतेज पाटील यांनी आम्हाला जनता दलासह स्वीकारले, याबद्दल स्वाती कोरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा…वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार

अनेक पक्षांनी ऑफर दिली होती मात्र आमदार सतेज पाटील हे एकमेव नेते असे आहेत की त्यांनी आम्हाला आमच्या जनता दलासह स्वीकारले. याबद्दल ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षणापासून आम्ही सर्वजण आमदार सतेज पाटील यांच नेतृत्व स्वीकारल आहे असे त्यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभेसह इथून पुढ सर्वच राजकीय निवडणुकांत आम्ही आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे वडील स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा जो आधार होता, तोच आधार आमदार सतेज पाटील यांच्याकडून मोठ बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

पोरके होवू देणार नाही

माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या कुटुंबियांशी आपले पूर्वीपासून घरचे संबंध आहेत. एका विचाराने आम्ही पूर्वीपासून काम करत आहोत, असे यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना, तुमचे स्वतःचे अस्तित्व ठेवून आमच्यासोबत आलात तर पाठबळ देतो असे आम्ही सांगितले होत. त्यानंतर त्यांनी जनता दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा करून आज आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतलाय, हे कौतुकास्पद असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात तुमची ताकद आहे ही या ताकदीचा उपयोग आमच्यासोबत सर्वच निवडणुकांमध्ये होईल,असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या हसन मुश्रीफ यांच्यावरील ‘त्या’ पोस्टने रंगतदार चर्चा; कोल्हापूरकरांनीही दिल्या शुभेच्छा

आपले ऋणानुबंध कायम ठेवण गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची उणीव कधीच भासू दिली जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला कधीही पोरक आणि परक वाटू दिल जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली. आपल्या देशातील लोकशाही आता धोक्यात आली आहे. भाजपाने ४०० जागा पारचा नारा दिला. त्यामुळे त्यांचा देशाची घटना बदलण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमताचा अट्टाहास सुरू असल्याचा घणाघात यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला.

हेही वाचा…शक्तीपीठ महामार्ग विरोधात रणशिंग; कोल्हापुरात ४ एप्रिलला शेतकऱ्यांचा मेळावा

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या गटातील सर्वजण एकत्र आले, हे भविष्याला दिशा देण्याचे मोलाचे काम घडल्याचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी बोलताना सांगितले. यावेळी बाळेश नाईक, काशिनाथ देवगोंडा, सदानंद व्हनबट्टी, बाळासाहेब मोरे, राम मजगी, श्रीरंग चौगुले ,विठ्ठलराव मुसळे, भीमराव पाटील, शिवाजीराव काकडे ,पी .एम. नदाफ, हिंदुराव नवकुडकर, प्रवीण शिंदे, रामगोंड पाटील, बाळासाहेब परीट, उदय कदम, दत्तात्रय मगदूम, शशिकांत चौगुले, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी आभार मानले.