scorecardresearch

Premium

‘गोकुळ’ दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक नुकतीच पार पडली.

‘गोकुळ’ दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ

कोल्हापूर : राज्यातील सर्वांत मोठा सहकारी दूध संघ असलेल्या ‘गोकुळ’ने शुक्रवारी आपल्या दुधाच्या खरेदी आणि विक्री किमतीमध्ये वाढ केली. यामध्ये म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये, तर गाईच्या दूध दरात एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याच वेळी कोल्हापूर विभाग वगळता मुंबई-पुणे महानगरातील दूध विक्रीच्या दरात दोन रुपये वाढ करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक नुकतीच पार पडली. या वेळी विरोधी गटाने सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यांत दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली.

सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ’ची सध्या दररोज बारा लाख लिटर दूध खरेदी होत आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दूध उत्पादकांच्या म्हशीच्या दूध दरात दोन रुपये, तर गाईच्या दूध दरात एक रुपया वाढ करण्यात येत आहे. तर कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, कोकण भाग वगळता इतरत्र दूध विक्री दरामध्येही वाढ होणार आहे. पुणे-मुंबई येथे टोंड, स्टँडर्ड प्रकार वगळता इतर दुधामध्ये लिटरमागे प्रत्येकी दोन रुपये वाढ केली आहे. दरम्यान ‘गोकुळ’ची दूध विक्री वीस लाख लिटर करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दरवर्षी दोन लक्ष लिटर वृद्धी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

धाडसी निर्णय

राज्यात अन्यत्र दूध खरेदीमध्ये कपात होत असताना ‘गोकुळ’ने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय धाडसी मानला जात आहे. त्यांच्या या निर्णयाचा फायदा साडेचार लाख दूध उत्पादकांना होणार आहे. ‘गोकुळ’तर्फे मुंबईमध्ये प्रतिदिन आठ लाख लिटर, तर पुण्यामध्ये तीन लाख लिटर दुधाची विक्री केली जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase in buying and selling price of gokul milk akp

First published on: 10-07-2021 at 01:40 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×