सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधींबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. गांधींची हत्या करून नथुराम गोडसेने योग्य केलं, असं ते म्हणाले. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – संयोगीताराजेंच्या आरोपांवर संभाजीराजेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले, “नाशिकमध्ये त्यांना जो अनुभव आला…”

नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज?

नथुराम गोडसेबाबत तुम्ही जेवढं वाचन कराल, तेवढं तुम्ही नथुराम गोडसेचे भक्त आणि गांधींचे विरोधक व्हाल. गांधींची हत्या करून गोडसेने योग्यच केलं. महात्मा नथुराम गोडसेला मी कोटी कोटी नमस्कार करतो. ते नसते तर आज भारताचा नाश झाला असता, अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांनी दिली.

हेही वाचा – राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! संघाला ‘कौरव’ म्हणणे पडले महागात, आरएसएस कार्यकर्त्याने पाठवली मानहानीची नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कालीचरण महाराजांकडून यापूर्वीही आक्षेपार्ह विधान

दरम्यान, कालीचरण महाराजांनी यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेंना नमन केलं होतं. या घडामोडीनंतर छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल केला होता. यानंतर कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती.