कोल्हापूर : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने आयोजित उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०२३ -२४ सालासाठी कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

बँकेला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा गुरुवारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. बँकेच्या प्रांगणात मुश्रीफ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. साखरपेढ्यांचे वाटप करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह मुला-बाळांचे संवर्धन करणारी ती जननी आहे. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण वागून अधिकाधिक ठेवी मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्या, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केले. बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.