सेनादलात विद्युत अभियंता म्हणून काम करणारे जवान सतीश सोनाप्पा वायदंडे (वय ३६) यांचे आसाम येथे कर्तव्य बजावत असताना गुरुवारी अपघाती निधन झाले. वायदंडे हे जिल्ह्य़ातील शिरोळ तालुक्यातील कोथळी गावचे रहिवासी होते. त्यांच्यामागे वडील, आई, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

विद्युत अभियांत्रिकेचे पदवीधर असलेले वायदंडे हे २००९ साली सैन्यदलात भरती झाले. आसाम येथे कर्तव्य बजावत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. ते प्रवास करीत असलेले वाहन खोल दरीत कोसळले. त्यात वायदंडे यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला.

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अपर्णा मोरे यांनी वायदंडे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.