चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन तिचा गळा दाबून खून केला. त्यानेच वृद्धास मारहाण केली. ही घटना चिंचवाड (ता. शिरोळ येथे घडली.
या हल्ल्यामध्ये चंपाबाई ककडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. अरिहंत उर्फ किरण महावीर चौगुले (रा. हुपरी_ यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की. आजी चंपाबाई ककडे व आजोबा गोपाल ककडे ह हे नंदीवाले वसाहत भागात राहतात.
काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून वाद घातला. भूपाल ककडे यांनी कोण आहेस,अशी विचारणा केली. त्यावर त्यांने त्यांच्या छातीवर लाथ मारली. तर चंपाबाई ककडे यांचा साडीच्या पदराने गळा आवळून खून केला. त्यांच्या अंगावर असलेले मंगळसूत्र, बोरमाळ, कर्णफुले असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.