कोल्हापूर : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृति आणि धार्मिक ग्रंथांचा समावेश करण्यास आज कोल्हापुरात प्राकृतिक पक्षांच्या वतीने विरोध करण्यात आला तसेच याबाबतचा मसुदा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सहीने प्रसिद्ध झालेला आहे. या मंत्र्यांनी भारतीय घटनेची शपथ घेतलेली असताना अशातऱ्हेचे कृत्य हे घटनाद्रोही आहे. त्यांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. शैक्षणिक धोरणाचा आराखडा नुकताच शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. त्या संदर्भात आक्षेप घेण्यासाठी प्रागतिक पुरोगामी पक्ष व संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळेस बोलताना सतीशचंद्र कांबळे म्हणाले की नुकताच राज्य सरकारने शैक्षणिक आराखडा जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा अंतर्भाव पान नंबर ९० वर केलेला आहे.महात्मा फुलेंनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला पाहिजे असे म्हटले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदरचा ग्रंथ जाळून टाकला.आता परत हे मनुवादी सरकार कालबाह्य मनुस्मृति शिक्षणामध्ये आणून तरुण पिढी बरबाद करू इच्छिते. त्याला आमचा विरोध आहे. हा आराखडा ताबडतोबिने मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजयराव देवणे म्हणाले की शिव,शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार आम्हाला माहित आहे.तो विचार सोडून आणि त्या विचाराच्या विरोधात जे काही पण घडेल त्या विरोधात कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही. हे सरकारने लक्षात ठेवले पाहिजे. चंद्रकांत यादव म्हणाले की या शैक्षणिक आराखडा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सहीने प्रसिद्ध झालेला आहे.त्यामुळे त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर के पोवार म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात शिक्षणाचे जे वैभव होते. ते सर्व वैभव आता हे सरकार मनुस्मृतीच्या माध्यमातून धुळीला मिळवत आहे. त्यामुळे शाहूप्रेमी कोल्हापूरची जनता अशा या मनुवादी विचारांच्या विचारांना आक्रमकपणे उत्तर दिल्याशिवाय शांत राहणार नाही. प्रसंगी कोल्हापुरात चौका चौकात मनुस्मृतीचे दहन केले जाईल. यावेळेस व्यंकाप्पा भोसले, सुरेश कुराडे, बाबा इंदुलकर, अनिल चव्हाण यांनी देखील आपले विचार मांडले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपली हे निवेदन तुमच्या सर्वांच्या वतीने आक्षेप म्हणून मी नोंदवून घेत आहे.आणि तुमच्या या भावना सरकारला ताबडतोबिने कळवल्या जातील असे आश्वासन दिले.

हेही वाचा : इचलकरंजी महापालिकेची अतिक्रमण मोहीम दुसऱ्या दिवशीही सक्रिय; हातगाडे, फलक जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळेस प्रागतिक, पुरोगामी पक्ष व संघटनेचे सतीशचंद्र कांबळे, विजय देवणे, आर के पवार,चंद्रकांत यादव, दिलीप पवार, बाबुराव कदम, बाबा इंदुलकर, रमेश वडणगेेकर,सुरेश कुराडे,बी एल बर्गे, अनिल चव्हाण, प्रकाश जाधव,फिरोज सरगुर, मारोतराव कातवरे,दगडू भास्कर, दिलदार मुजावर, महादेव पाटील,रमेश कांबळे,राजाराम धनवडे, जॉन भोरे,अमर जाधव,जयंत मिठारी, राजेंद्र खदरे, आनंदराव चौगुले, शर्मन पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, शिवाजी शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.