कोल्हापूर : युवतीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून त्याची चित्रफीत बनवल्या प्रकरणी येथील गावभाग पोलिसांनी इचलकरंजी येथील संशयित आरोपी सुरज सलीम शेख (वय १९, रा. लालनगर) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

वसई (ता. पालघर) येथे खासगी नोकरी करणारी पीडित युवतीची जून २०२४ मध्ये समाज माध्यमावर सुरज शेख याच्याशी ओळख झाली. त्यातून दोघांच्यात मैत्री झाली. पुढील महिन्यात पीडित युवती सुरजला भेटण्यासाठी इचलकरंजीला आली होती. त्यावेळी सुरजने तिच्याशी शरीरसंबंध ठेवून त्याची चित्रफीत बनवली. ही चित्रफीत नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत सुरज याने तिच्याशी वारंवार अत्याचार केले. तसेच तुझा विवाह अन्यत्र ठरवला तर घरच्यांना ठार मारण्याचीही धमकी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात संशयित सुरज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सुरजला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.