करोनामुळे बदलत चाललेल्या परिस्थितीचा लाभ उठवून कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा आयटी पार्क विकसित करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. केपीएमजी कंपनीकडून येत्या आठवड्यात प्रस्तावित आराखडा महापालिकेडे सादर केलं जाणार आहे. याबाबत आवश्यक त्या सूचना दोन दिवसात आयटी असोसिएशनकडे द्याव्यात अस आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूरात आयटी पार्क विकसित करण्यासंदर्भात मंत्री पाटील यांनी आज आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. आयटी असोसिएशनचे ओंकार देशपांडे, अद्वित दीक्षित, स्नेहल बियाणी, प्रसन्न कुलकर्णी, विश्वजित देसाई, आदी सहभागी झाले होते.

स्थानिकांना ५० टक्के आरक्षण

रोहन तस्ते यांनी कोल्हापूर आयटी पार्कसाठी केपीएमजी कंपनीच्या प्रस्तावित तयार आराखड्याची सर्व माहिती दिली. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या ठिकाणी आयटी पार्क विकसित करून हॉटेल आणि शॉपिंग प्लाझाही करता येते असे सांगितले. यावेळी आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक कंपन्यांना ५० टक्के जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी केली. यावर मंत्री सतेज पाटील यांनी बाहेरची मोठी कंपनी आल्यावर स्थानिक लहान कंपन्यांसाठी जागा राखीव ठेवूया. जिल्हा आयटी फर्म स्थापन करून सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. आयटी असोसिएशन आणि प्रशासन असं प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करू. कोल्हापूरात आयटी पार्क विकसीत होण्यासाठी सकारात्मक पाऊले टाकण्यात येतील त्यासाठी अधिकृत समिती गठीत करू असे त्यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur satej patil it hub develop in kolhapur nck
First published on: 16-05-2020 at 19:33 IST