करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाचा ७२ कोटींचा पहिला टप्प्यातील आराखाडय़ास तत्त्वत: मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंजुरी दिली. ७२ कोटींचा हा आराखडा शासनास सादर केला जाणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आज महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाबाबत बठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, आयुक्त पी. शिवशंकर यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ातील पहिला टप्प्यातील विकास कामांचे सादरीकरण केले. यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काही सूचना केल्या. या सूचनांनुसार बदल करून हा आराखडा शासनास सादर केला जाणार आहे.
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तीन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७२ कोटी, दुसऱ्या टप्प्यात ११६ कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात ६७ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत.
सोमवारी पहिल्या टप्प्यातील ७२ कोटींची कामे अंतिम करण्यात आली. यामध्ये मंदिर परिसरामध्ये असणारे मूळ मंदिराच्या वास्तूचे संवर्धन, दीपमाळ, गरुड मंडप, नगारखाना, मंदिर दरवाजे, दरवाजांशी संलग्न िभती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कार्यालय, महालक्ष्मी बगिच्याचे सुशोभीकरण, कारंजा अणि स्वच्छतागृहे यांच्यासाठी ७ कोटी रुपये. युटीलिटी शिफ्टिंग १० कोटी, तर कचरा उठावासाठी २ कोटी, आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत फायर इंजिन, फायर हाउस व अन्य सुविधा, प्रथमोपचार, सुरक्षा यंत्रणा, वाहतनतळ, भवानी मंडप सुशोभीकरण, पर्यटकांसाठी सुविधा यामध्ये दर्शनरांग मंडप, भक्तनिवास, टेंबालाई मंदिर या कामांचा समावेश आहे. तसेच टेंबलाई मंदिर येथे भक्तनिवास बांधल्यास भक्तनिवासापासून मंदिरापर्यंत के.एम.टी. सुविधा महापालिकेने द्यावी अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. याला महापालिकेने दुजोरा दिला.
पहिल्या टप्प्यातील हा आराखडा शासनाकडे सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना केल्याप्रमाणे मंदिर आराखडा तीन टप्प्यात सादर होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2016 रोजी प्रकाशित
महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ास मंजुरी
७२ कोटींचा पहिला टप्पा; चंद्रकांत पाटील यांची माहिती
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-02-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahalakshmi temple pilgrim development plan approval