कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज ( बंटी ) पाटील आणि महाडिक कुटुंबीय हे प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने आले आहेत. सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सभांत टीका-टीपण्णी होत आहेत. अशातच जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विनय कोरे यांनी बंटी पाटलांवर ‘शब्द’ न पाळल्याचा आरोप केला आहे.

सत्ताधारी सहकार आघाडीची विजय निर्धार प्रचार सभा हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे पार पडली. तेव्हा बोलताना विनय कोरे म्हणाले, “विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. तेव्हा माझ्या घरी चंद्रकांत पाटील, संजय पाटील आणि बंटी पाटील यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत संजय पाटील आणि बंटी पाटील यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करावी. मग, आम्ही राजाराम कारखाना निवडणूक बिनविरोध करू, अस ‘शब्द’ मला दिला होता.”

हेही वाचा : “तुमचा पक्ष आणि मुखपत्राबद्दल बोला, आमची भूमिका…”, अजित पवारांनी संजय राऊतांना खडसावलं

“त्या पार्श्वभूमीवर मी महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांना विनंती केली होती. त्यांनी माझ्या विनंतीला मान देत विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध केली,” असं विनय कोरे यांनी सांगितलं.

“राजाराम कारखाना सभासद अपात्रता प्रकरणावेळी बंटी पाटलांना दिलेल्या ‘शब्दा’ची आठवण करून दिली. मात्र, बंटी पाटलांनी ‘शब्द’ फिरवून सभासदांवर निवडणूक लादली. पण, महाडिकांना दिलेला ‘शब्द’ मी पाळणार आहे,” अशी स्पष्टोक्ती विनय कोरे यांनी दिली.

हेही वाचा : “एकच वादा…”; अजित पवारांची नाराजी ही राष्ट्रवादीची नियोजित खेळी होती? NCP च्या आमदाराचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनय कोरे यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत खासदार धनंजय महाडिक यांनी बंटी पाटलांवर टीकास्र डागलं. “बंटी पाटील हे नैतिकता नसणारे नेते आहेत. त्यांना कोल्हापूरकर योग्य उत्तर देतील,” असा हल्लाबोल धनंजय महाडिक यांनी केला.