प्रवासी वाहनातील ३ लॅपटॉप व ८ मोबाईल चोरणाऱ्या तरुणास बुधवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. अभिषेक अर्जुन पाटील (वय २४ , रा . नागाला पार्क) असे त्याचे नाव आहे . त्याच्याकडून १ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गस्तीपथक आज सायंकाळी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गस्त घालत होते. त्यांना या परिसरात अनोळखी व्यक्ती लॅपटॉप व मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. रेल्वे फाटकाजवळ असलेल्या जेम्स स्टोन इमारती नजीक एक व्यक्ती पोलिसांना दिसली. पूर्वी त्याला घरफोडीच्या गुन्ह्यात पकडले असल्याचे लक्षात आल्याने त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अभिषेक अर्जुन पाटील असे नाव असल्याचे सांगून चौकशीवेळी त्याने, प्रवासी वाहनातील ३ लॅपटॉप व ८ मोबाईल चोरल्याची कबुली देऊन आपल्याकडे असणारे चोरीचे साहित्य त्याने पोलिसांना दिले.