या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हद्दवाढ झालीच पाहिजे, या मागणीसाठी शहरातील सर्वच पक्ष, संघटनांची एकजूट करून लढा उभारला आहे. आता नाही, तर कधीच नाही याची जाणीव झालेल्या शहरवासीयांनी आंदोलन तीव्र केले. याअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ त्वरित जाहीर करावी, अशी मागणी करीत सोमवारी दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळपासून दसरा चौकात कार्यकत्रे, नागरिक जमू लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, भाकपसह सर्व डावे पक्ष, समाजवादी पक्ष तसेच सामाजिक संघटना आदींचे पदाधिकारी, कार्यकत्रे जमा होऊ लागले. पावसाच्या सरी आल्यानंतर पांगलेला जनसमुदाय पाऊस गेल्यानंतर पुन्हा पुतळय़ासमोर जमा झाला, पण सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी मात्र भरपावसात बसून होते. या वेळी बाबा पार्टे, दीपा पाटील, महेश जाधव यांसह प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी हद्दवाढ करण्याचा निर्धार करणारी प्रतिज्ञा घेण्यात आली, तसेच हद्दवाढ विरोध करणाऱ्यांना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी देऊ नये अन्यथा त्यांच्या समोरच प्रतिआंदोलन करू, असा इशारा हद्दवाढ कृती समितीच्या वतीने दिला.

हद्दवाढीच्या समर्थनार्थ दसरा चौकातील शाहूमहाराजांच्या पुतळय़ासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, हद्दवाढविरोधकांचा धिक्कार असो, हद्दवाढ आमच्या हक्काची, अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला. हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांचा निषेध करत सर्वपक्षीय शहरवासीयांनी हद्दवाढीसाठी प्रतिज्ञा घेतली. कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ झाल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. राजेश लाटकर यांनी हद्दवाढीबाबतची प्रतिज्ञा सर्वाकडून म्हणवून घेतली. या वेळी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, मुंबई येथील बठक मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढ करण्याबाबत शब्द दिला होता. त्याप्रमाणे १८ गावे व दोन औद्योगिक वसाहती यासह २४ ऑगस्टपर्यंत अधिसूचना काढून शब्द पाळावा अन्यथा २५ तारखेपासून कृती समिती बेमुदत उपोषण करणार यामध्ये महिलाही सहभागी होणार आहेत.

शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाने राष्ट्रवादी अस्वस्थ

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीसाठी सुरुवातीपासूनच आवाज उठवला आहे. या आंदोलनात शिवसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दसरा चौकात होणाऱ्या आंदोलनासाठी शिवसनिक दुचाकी रॅलीने हजर झाले. भगव्या टोप्या परिधान केलेले, भगवे झेंडे हातात घेऊन घोषणा देत शिवसनिक चौकात आले. यामुळे राष्ट्रवादीचे आर. के. पोवार मात्र अस्वस्थ झाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement in kolhapur for border issue
First published on: 23-08-2016 at 01:34 IST