जिल्ह्य़ात २९ नवे रुग्ण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : करोनाच्या दृष्टीने कोल्हापूरसाठी आजची सकाळी दिलासादायक ठरली तर सायंकाळी प्राप्त अहवालामुळे चिंता वाढली. १६३८ रुग्णांचे अहवाल नकारात्मक आहेत. सकाळी ३४६ प्राप्त अहवालापैकी ३ अहवाल सकारात्मक होते. पण, गुरुवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार २९ करोना बाधितांचे अहवाल सकारात्मक आल्याने ही संख्या दोनशेच्या वर जात २११ झाली.

आज सकाळी एकूण १८२ सकारात्मक रुग्ण होते. त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. काल रात्री १२९५ आणि आज सकाळी ३४३ असे १६३८ अहवाल नकारात्मक आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना ठरली. त्याची चर्चा होत असताना संध्याकाळी २९ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आल्याने चिंता पुन्हा वाढली.

२७ हजार मजूर रवाना

शासनाने परप्रांतात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची सोय केली आहे. या अंतर्गत आजअखेर एकूण २० रेल्वेमधून २७ हजार ३७७ मजूर जिल्ह्यामधून मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यातील १४०१ मजुरांना घेऊन आज दुपारी  बिहारमधील अरारियाकडे रेल्वे रवाना झाली. रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक १३ हजार ५५२ उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे ९ हजार ८२२, मध्य प्रदेशकडे १०६६, झारखंडकडे १४६० आणि राजस्थानकडे १४७७ मजूर परतले आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of coronavirus victims in kolhapur district is over two hundred zws
First published on: 22-05-2020 at 04:15 IST