कोल्हापूर जिल्ह्यातील आकुर्डे गावात गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेले रघुनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. शिंदे यांना प्राथमिक उपचारानंतर कोल्हापुरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्याने त्यांचाही मृत्यू झाला आहे.  शुक्रवारी सकाळी भुदरगड तालुक्यातील आकुर्डे गावातील भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात हा प्रकार घडला. अनिल पवारसह आणखी दोन तरुण जनावरांना चारा आणण्यासाठी शिवारात ऊसाचा पाला काढण्यासाठी गेले होते. यावेळी कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने अनिल पवार या तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात पोटात शिंगे घुसून रक्तस्त्राव झाल्याने अनिल पवार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गव्याने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर जीव वाचवून पळालेल्या दोघांनी ग्रामस्थांना या दुर्घटनेची माहिती दिली. हे वृत्त कळताच स्थानिक बी न्यूजचे रघुनाथ शिंदे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बांधावर उभे राहून घटनेचे चित्रीकरण करत असताना, या गव्याने शिंदे यांच्यावरही हल्ला केला. गव्याने त्यांना धडक मारत १०-१२ फुटावर भिरकावून दिले. या हल्लात शिंदे यांच्या पोटात आणि मांडीत शिंगे घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. शिंदे यांना गारगोटी येथे प्रथमोपचार करून तातडीने कोल्हापुरला हलवण्यात आले. मात्र, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One man died bison attack attack in kolhapur
First published on: 12-05-2017 at 14:20 IST