कोल्हापूर : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रविवारी मतदान होवून सर्वपक्षीय सत्ताधारी आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. बंडखोर भाजपाच्या विरोधी आघाडीचा दारूण पराभव झाला.

या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपाचे अनिल यादव, पृथ्वीराज यादव, शिवसेनेचे वैभव उगळे यांनी आघाडी केली होती. त्यांचासमोर भाजपाच्या रामचंद्र डांगे, राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, संजय पाटील यांनी आव्हान उभे केले होते. पण ते अगदीच सुमार ठरले. सात जागा जिंकून सत्ताधारी आघाडीने विजयाची पायाभरणी केली होती. आजच्या निकालाने त्यावर कळस चढवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मताधिक्यात मोठा फरक

आज दिवसभर संस्था गटात १९१० पैकी १७३२ ( ९०.६८ टक्के) तर ग्रामपंचायत गटात ६६८ पैकी ६२९ ( ९४.१६ टक्के) मतदारांनी मतदान केले. सायंकाळी मतमोजणी होवून सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांनी सरासरी १४०० मते मिळवली. विरोधकांना ३०० च्या पुढे मतदान घेताना शिकस्त करावी लागली. निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.