कोल्हापूर : इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणले. बनावट नोटांचे हे प्रकरण कोल्हापूर शहर आणि सांगळूर (ता. करवीर) येथील प्रकरणाशी जोडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मुख्य संशयित अंबाजी सुळेकर व राजूभाई लवंगे या दोघांना अटक केली आहे.

या कारवाईत त्यांच्याकडून दोन हजार पासून ५० रुपयांच्या १० लाख ५४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्या तयार करण्यासाठी वापरले जाणारे संगणक, प्रिंटर असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून त्याचा कर्नाटकाशी संबंध असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी व पोलिस निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.