कोल्हापूर  : ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे केली.राज्यात अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणावरून वाक्युद्ध रंगले आहे.  त्यावर महसूल मंत्री विखे पाटील हेही वारंवार भूमिका व्यक्त करताना दिसतात. विखे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे समाजात वादळ निर्माण होत आहेत, असा नाराजीचा सूर लावला होता. तर आज त्याच्याही पलीकडे जात त्यांनी भुजबळ यांनी  राजीनामा देण्याची मागणी केली.

 आज येथे विखे पाटील म्हणाले, सध्या समाजात ओबीसी – मराठा असा निरर्थक वाद सुरू आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संयम पाळणे गरजेचे आहे. लोक त्यांच्याविषयी आदराने बोलतात.नंतर त्यांच्यावर वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. यासाठी त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर जाऊन बोलले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.आरक्षणासाठी राज्य शासन प्रामाणिकपणे भूमिका घेऊन लोकांसमोर जात असताना त्याची विश्वासार्हता अशा घटनांमुळे प्रश्नांकित होत आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या वेगळ्या भूमिकेविषयी मुख्यमंत्र्यांनी ही विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
mva stage protest with black ribbon on mouth condemning girls sex abuse in badlapur school
भर पावसात ‘मविआ’चे मूकआंदोलन; तोंडावर काळी पट्टी बांधून बदलापूरच्या घटनेचा निषेध
Mamata Banerjee On PM Narendra Modi
Mamata Banerjee : “देशात रोज ९० बलात्काराच्या घटना घडतात”, ममता बॅनर्जींनी मोदींना पत्र लिहित केली कठोर कायद्याची मागणी
Amit shah sursh Gopi
Suresh Gopi : “…अन् अमित शाहांनी हातातले कागद फेकून दिले”, भाजपाच्या मंत्र्याने सांगितला तो प्रसंग
eknath shinde
Eknath Shinde : “राज ठाकरेंना पक्षात जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा…”; उद्धव ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
eknath shinde mukhyamantri ladki bahin yojana marathi news
Eknath Shidne: “विरोधकांनो, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो…”, एकनाथ शिंदे म्हणाले, “अनेकांना पुरुन…”