कोल्हापूर शहराला आतापासूनच उन्हाळझळा जाणवू लागल्या आहेत. अनियमित आणि अपुरे पाणी येत असल्याने संतप्त झालेल्या मार्केट यार्ड, बापट कॅम्प परिसरातील नागरिकांनी बुधवारी कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको आंदोलन केले.

 गेल्या अनेक दिवसापासून या भागाला व नियमित अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महापालिका जलविभागाला कळवून सुधारणा झाली नाही. त्यामुळे आज अचानकच या भागातील नागरिक रस्त्यावर उतरले. तेथे पोलीस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी आले. नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना पाणी प्रश्नावरून धारेवर धरले.

हेही वाचा >>>कोल्हापुरातील लक्षतीर्थ मदरसावर अतिक्रमण पथकाची कारवाई; मुस्लिम समाजाच्या विरोधामुळे तणाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी नागरिकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बनवण्याचे मान्य केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर  व सहकार्यांनी नागरिकांना बाजूला केल्यानंतर लोक पांगले. दरम्यान यावेळी या मुख्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगालागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.