दयानंद लिपारे

‘महाराष्ट्राच्या सभागृहात काम करण्याची इच्छा जनतेच्या आशीर्वादाने साध्य होईल’ असे विधान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागल विधानसभा मतदारसंघात भाजपचा तरुण चेहरा म्हाडा (पुणे) चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना विधानसभा निवडणुकीसाठी हिरवा कंदील दाखवला. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील या राज्यातील दोन्ही श्रेष्ठ मंत्र्यांचे उघड पाठबळ मिळाल्याने समरजितसिंह घाटगे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आणखी ऊ र्जा मिळाली आहे. यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजितसिंह घाटगे यांचे समर आता रंगात येण्याची चिन्हे आहेत.

कागल तालुका हे कोल्हापुरातील राजकारणातील उलाढालीचे आजवर प्रमुख केंद्र राहीले आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक विरुद्ध शरद पवार, मंडलिक विरुद्ध मुश्रीफ यांच्या वादाचे पर्व कागल तालुक्याचाच नव्हे तर जिल्ह्यच्या राजकारणावर पडसाद उमटवत राहिले. मंडलिक यांच्या पश्चात मुश्रीफ आणि मंडलिक घराण्याचे नवे, तरुण नेतृत्व संजय मंडलिक यांचे सूर काही प्रमाणात जुळले. पण, याचवेळी दिवंगत आमदार राजे विR मसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजित घाटगे यांनी कागल तालुक्यात नवे नेतृत्व म्हणून जोरदार सूर मारला आहे. पालकमंत्री पाटील यांनी हेरलेला हा तरुण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार म्हणून पुढे आला आहे. त्यातून गुरुवारी फडणवीस यांच्या समोर त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरवत विधानसभा प्रचाराचा नारळच फोडला आहे.

भाजपचे समरजितसिंहांना पाठबळ

गेल्या चार वर्षांपासून समरजित घाटगे यांनी कागल तालुक्यात संपर्क वाढवला आहे. रस्ते, पूल, धरण या विकासकामांपासून ते वैयक्तिक स्वरूपाची कामे करण्यावर त्यांचा मोठा भर आहे. कोणत्याही मध्यस्थाची मदत न घेता थेट ‘वर्षां’ बंगल्यावर संपर्क हे त्यांच्या कामाचे वैशिष्टय़ ठरल्याने मुख्यमंत्री फडणवीसही त्यांच्या कामावर खूश आहेत. त्यामुळेच घाटगे यांच्या तिसऱ्या कार्यR माला त्यांनी आवर्जून हजेरी लावली. घाटगे यांनी सादर केलेल्या कामांना सत्वर प्रतिसाद देऊ न त्यांना राजकीय बळ देण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे. यायोगे आमदार मुश्रीफ यांचा पाडाव करण्याची भाजपाची रणनीती आहे. त्यातूनच फडणवीस यांनी मुश्रीफ यांच्या ‘पर्मनंट आमदार’ या फलकांची खिल्ली उडवून ‘पर्मनंट’ कोणीही नसतो, असे म्हणत घाटगे यांना मैदान मारण्यासाठी सज्ज राहण्याचे सांगून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दर्शवला आहे.

घाटगे आणि घाटगे

मुख्यमंत्र्यांच्या कागल दौऱ्याने घाटगे यांना हुरूप आला आहे. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही श्रेष्ठ मंत्र्यांचे समर्थन मिळाल्याने घाटगे यांना विधानसभा निवडणुकीचे आव्हान सोपे वाटू लागले आहे. याचवेळी घाटगे आणि घाटगे असा एक नवा गुंता पुढे आला आहे. कागल मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. शिवसेनेतील माजी आमदार संजय घाटगे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यांनी गुरुवारच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यR माला गैरहजेरी लावून नापसंती व्यक्त केली आहे. दोघा घाटगेंची संगती जमल्याशिवाय कागलचे मैदान मारणे सोपे नाही. दोघा घाटगेंनी मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू मारला आहे. मात्र एका कोणाला आखाडय़ात आणायचे असेल तर एकाची समजूत काढावी लागेल. दोघांकडे काही जमेच्या बाजू आहेत, काही कमतरताही आहे. अशावेळी नाराज दुसऱ्या इच्छुक घाटगेंच्या अपेक्षांवर योग्य मात्रा नाजूक हाताने काढण्याचे काम युतीच्या सर्वोच्च नेत्यांना अधिक जबाबदारीने करावे लागणार आहे.