कोल्हापूर: श्रीमंत शाहू महाराजांविषयी महायुतीच्या नेत्यांना खरंच आदर असेल तर त्यांनी महाराजांना लोकसभेवर बिनविरोध पाठवावे. एका बाजूला महाराज हे आमचे आधार आहे असे म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी निवडणुकीला उभे राहू नये अशी विनंती करतात. हा विरोधकांचा विषयांतराचा भाग आहे. या विषयात खोलात पडायची गरज नाही. महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने महाराजांच्या या निवडणुकीत उतरणार आहे, असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय मागे घेवून शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा घेतलेल्या निर्णयाबाबत सतेज पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. संभाजीराजेनी घर म्हणून त्यांची जबाबदारी ओळखत घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. महाविकास आघाडी म्हणून ही जागा काँग्रेसला यावी आणि या जागेवरून शाहू महाराज छत्रपती लढावे, ही आमची आणि तमाम कोल्हापूरकरांची इच्छा होती. यामुळें कोल्हापूरचे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत हा आमचा प्रयत्न असेल, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>इचलकरंजी पाणी योजनेसाठी वेळप्रसंगी न्यायालयात धाव – खासदार धैर्यशील माने

ते म्हणाले, आमच्यात कोणताही वाद विवाद नाही. आमच धोरण पक्क आहे. भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी आहे. आणि देशात व  राज्यात जे काही कारभार सुरू आहे, त्या विरोधात सक्षम उमेदवार देणे, तो निवडून आणणे हे आमचे धोरण आहे. कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्याला यश येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satej patil statement that shahu maharaj should be elected unopposed kolhapur amy
First published on: 07-03-2024 at 02:31 IST