कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी गुरुवारी अरुण गणपतराव डोंगरे यांची एकमताने निवड झाली. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. डोंगळे यांचा दुग्ध व्यवसायातील अभ्यास व ज्येष्ठत्वाचा विचार करून त्यांना दुसऱ्यांदा हि संधी देण्यात आली आहे.
गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) या संस्थेची निवडणूक होवून सत्ताबदल झाला होता पहिले. अध्यक्ष विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला होता. यानंतर सत्ताधारी गटाचे नेते हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे आदी आमदारांची बैठक होऊन नवीन अध्यक्ष निवडीचा विचार झाला होता. त्यानुसार आजच्या संचालक बैठकीत विश्वास पाटील यांनी डोंगळे यांचे नाव सुचवले त्याला नवीद मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. निवडी नंतर सभेचे अध्यक्ष उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी अरुण डोंगळे यांचा सत्कार केला. यावेळी सर्व संचालक. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.
दूध,दर वाढीसाठी प्रयत्न
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गोकुळचे दूध संकलन २० लाख लिटर करणे दूध उत्पादकांना दरवाढ देणे अशी मुख्य उद्दिष्ट साध्य करणार असल्याचे सांगितले. कृत्रिम रेतन कामकाजा सुधारणा करून मादी जनावरांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गडमुडशिंगी येथे जनावरांसाठी अद्यावत प्रयोगशाळा उभारली जाणार असून तेथील पशुद्धकारखान्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.