कोल्हापूर : बंडखोर आमदारांनी स्वाभिमान गहाण ठेवला नसेल तर ज्या पक्षाच्या जीवावर निवडून आलात त्याचा प्रथम राजीनामा द्यावा. गद्दार आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे , असेआव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी आजरा येथे सभेत फुटीरांना दिले.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते आदेश बांदेकर उपस्थित होते. ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांनी या गद्दार आमदारांना अपेक्षेपेक्षा जास्त दिले.तरीही त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांना ५६७ कोटीचा निधी दिला. तरीही ते चुकीचे वागले. कोणाच्या दडपणामुळे ते गेले माहित नाही. आगामी काळात महाराष्ट्रातील जनता या गद्दार आमदारांना धडा शिकवेल.

 आजरा येथील संभाजी महाराज चौक भगवामय झाला होता. मोठा जनसमुदाय आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी उपस्थित होता. उद्धव ठाकरे आप आगे बढो हम आपके साथ है, शिवसेना जिंदाबाद गद्दार आमदारांचं करायचं काय.- खाली डोकं वर पाय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार प्रकाश आबिटकर यांना ‘ एक रुपया- एक मत मागून शिवसैनिकांनी आमदार केले. पहिला विजय शिवसैनिकांनी मिळवून दिला. आता पहिला पराभव देखील शिवसैनिकच करतील , असा घणाघात  आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी भाषणात लगावला.