भ्रामक कल्पनांचा पगडा घेऊन वावरणाऱ्या वर्गाबद्दल राजर्षी शाहू महाराजांना संताप होता. ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी शाहूंच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा’ या प्रा. डॉ. पद्मा कदम यांनी हिंदीत अनुवादित केलेल्या शाहू चरित्रग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते येथे झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, दबलेल्या, पिचलेल्या वर्गाबाबत शाहूंनी राखीव जागांचा वटहुकूम काढला. त्या वटहुकमामुळे आजही राज्यकत्रे चाचपडत आहेत. त्यांनी सामान्य, दुर्लक्षित, उपेक्षित माणूस केंद्रिबदू मानून समाजकार्याचा मार्ग अवलंबला.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, समाजात समता निर्माण होत नाही, तोपर्यंत शाहूंचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचले, असे म्हणता येणार नाही. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात जो शाहूंचा प्रकल्प डोळ्यांसमोर ठेवला, १५ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी हा ग्रंथ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असा ठेवलेला संकल्प आज पूर्ण करीत आहोत. डॉ. मंजूश्री पवार यांनी प्रास्ताविक केले.