पंधरा दिवसांत त्रयस्थ यंत्रणेकडून परीक्षण
कोटय़वधी रुपये खर्च करून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी केलेले शहरातील रस्ते मुसळधार पावसाने खराब झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी महापालिकेत जोरदार आंदोलन केले.
आयुक्तांच्या दालनाकडे जाण्यासाठीचा रस्ता प्रशासनाने बंद केल्याने संतप्त आंदोलकांनी प्रवेशद्वारावर लाथाबुक्क्या मारून प्रवेशद्वार उघडण्यास भाग पाडले. आयुक्त कार्यालयाबाहेर प्रशासनाच्या नाकत्रेपणाच्या विरोधात घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले.
शहरातील खराब रस्त्यांचे येत्या पंधरा दिवसांत त्रयस्थ यंत्रणेकडून परीक्षण करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे ठोस आश्वासन आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या आठवडय़ात शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरातील सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या नवीन रस्त्यांची चाळण केली आहे. ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी करावी या मागणीसाठी मंगळवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेण्यासाठी महापालिकेतील चौकात आले. या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता.
आयुक्तांच्या दालनाकडे जाणारा जिन्याजवळील दरवाजा प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवसनिकांनी बंद दरवाजावर लाथा-बुक्क्या मारून आपला निषेध व्यक्त केला.
दरवाजानजीक शिवसनिकांनी गोंधळ घालत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना हटवण्याची मागणी केली. सुमारे १५ मिनिटांनंतर प्रशासनाने दरवाजा उघडला. यानंतर आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाकडे धाव घेत दालनाबाहेरच ठिय्या मारला. आयुक्त पी. शिवशंकर यांनी के.एम.टी. कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेली बठक मधेच थांबवून शिवसेनेच्या शिष्टमंडळास भेट दिली.
जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी रस्त्यांच्या कामात अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून खिसे भारल्याचा आरोप केला.
खराब झालेले रस्ते संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्त नको तर नव्याने तयार करून घ्यावे अशी मागणी केली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जबाबदार असून त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. आंदोलनात शहर प्रमुख शिवाजी जाधव, दुग्रेश िलग्रस, राजू चौगुले, कमलाकर जगदाळे, शशी बिडकर, रणजित आयरेकर, हर्षल सुर्वे, शुभांगी साळोखे, पूजा भोर यांच्यासह शिवसनिक सहभागी झाले होते.