shiye kolhapur news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन तिचा खून झाल्याचा प्रकार कोल्हापूर शहराजवळील शिये गावात काल घडला. या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. त्याला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

कोलकत्ता, बदलापूरनंतर कोल्हापुरातील शियेमध्येही युवती, चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडला. शिये येथे मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे नातेवाईकानेच मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Kolhapur Bandh: हिंदू समाजाने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला प्रतिसाद

हेही वाचा – Kolhapur Girl Abuse and Murder: कोल्हापूर हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती देताना म्हणाले, “काल रात्री…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचे प्रसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. अवघ्या पाच तासांत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. या घटनेच्या निषेधार्थ आज शिये गाव बंद ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून आहे. गावात सकाळपासून कडकडीत बंद आहे.